WordPress.org

शिक्षण

Student Clubs

WordPress विद्यार्थी मंडळे

विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये WordPress समुदाय उभारण्यासाठी सक्षम बनवत आहोत.

या उपक्रमात का सहभागी व्हावे?

WordPress विद्यार्थी क्लबचा भाग बनल्याने तुम्हाला WordPress समुदायामध्ये शिकण्याची, इतरांशी जोडले जाण्याची आणि पुढाकार घेण्याची अर्थपूर्ण संधी मिळते. तुमच्या जवळचा विद्यार्थी क्लब शोधण्यासाठी खालील बटणाचा वापर करा.

शिका आणि प्रगती करा

तुम्ही सुरुवातीचा 'कॅम्पस कनेक्ट' (Campus Connect) कार्यक्रम हुकवला असला, तरीही कार्यशाळा, अभ्यास गट आणि प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून WordPress चा प्रत्यक्ष अनुभव मिळवा.

नेतृत्व आणि संघटन

विद्यार्थी-आयोजक म्हणून पुढाकार घ्या, नेतृत्व कौशल्ये विकसित करा आणि तुमच्या स्थानिक कॅम्पस-मधील WordPress समुदायाच्या वाढीस मदत करा.

सहभाग घ्या आणि जोडून घ्या

मासिक भेटीगाठी, सहयोगात्मक सत्रे आणि नियमितपणे होणारे 'WordPress Campus Connect' उपक्रम यांसारखे कार्यक्रम आयोजित करा; ज्यामुळे तुमचा समुदाय सक्रिय आणि प्रेरित राहील.

Image

Image
Image
Image

सहभाग कसा घ्यावा

Student Club तयार करण्याची विनंती करा

अर्ज करण्यापूर्वी, तुमच्या कॅम्पसमध्ये आधीच एखादा क्लब अस्तित्वात आहे का किंवा तुमच्या कॅम्पसने 'कॅम्पस कनेक्ट' (Campus Connect) कार्यक्रमात सहभाग घेतला आहे का, हे पाहण्यासाठी येथे तपासा. जर तुम्ही तुमचा स्वतःचा क्लब सुरू करण्यास सज्ज असाल, तर खालील बटणाचा वापर करून तुम्ही नवीन क्लब सुरू करण्याची विनंती सादर करू शकता. याची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला केवळ एका प्राध्यापकाची आणि दोन विद्यार्थी-सह-नेतृत्वकर्त्यांची (Student Co-leads) आवश्यकता असेल.